रत्नागिरी जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणाचा ३२ लाखाचा निधी परत

By admin | Published: March 14, 2017 05:55 PM2017-03-14T17:55:54+5:302017-03-14T17:55:54+5:30

वित्तीय मान्यता आणि संबंधित प्रवर्गातून एकही अर्ज नाही

32 lacs of agricultural mechanization in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणाचा ३२ लाखाचा निधी परत

रत्नागिरी जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणाचा ३२ लाखाचा निधी परत

Next

रत्नागिरी जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणाचा ३२ लाखाचा निधी परत
वित्तीय मान्यता आणि संबंधित प्रवर्गातून एकही अर्ज नाही
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी : कृषी उन्नती योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी यांत्रिक अवजारे अनुदानावर वितरीत करण्यात येतात. कृषी यांत्रिकीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्याकरिता ९० लाख ८८ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, सर्वसाधारण प्रवर्ग घटकासाठी १९ लाख ५६ हजार खर्च करण्यात येणार होता. वित्तीय मान्यता नसल्यामुळे निधी परत गेला. शिवाय अनुसूचित जाती - जमाती प्रवर्गासाठी १२.४६ हजार रूपये निधी मंजूर होता. परंतु या प्रवर्गातून एकही अर्ज नसल्यामुळे निधी परत गेला. एकूण ३२ लाख २ हजार रूपये इतका निधी परत पाठविण्यात आला आहे.
कृषी उन्नत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेती पावसावर अवलंबून असली तरी भातपिकानंतरही लोक शेतात अन्य उत्पन्न घेऊ लागले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून सामूदायिक शेतीकडे कल वाढला आहे. सिंचन व्यवस्थेचा फायदा घेत शेतकरी भाजीपाला, दुबार भातपीक तसेच कडधान्य व अन्य पिकांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. पेरणीपूर्वी शेतीची करावी लागणारी मशागत व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ विचारात घेता, कमीत कमी वेळेत, अधिकाधिक उत्पन्न मिळावे व मानवी श्रम कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर सुरू झाला आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पॉवर स्प्रेअर, ग्रासकटर, मिनी पॉवर विंडरसारखी अवजारे अनुदानावर वितरीत करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांकडून एकूण ३८९ प्रस्ताव आले होते. पैकी २१४ प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. ट्रॅक्टर २, पॉवर टिलर ४०, भातलावणी मशीन १, ग्रासकटर ४२ वितरीत करण्यात आले असून, त्यासाठी २२ लाख २० हजार रूपयांचा निधी अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. याशिवाय मांडकी-पालवण येथे कृषी अवजारे बँक स्थापना करण्यात आली असून, त्यासाठी ४ लाख रूपयांचे अनुदान देण्यात आले आहे. प्राप्त अनुदान ५८ लाख ३६ हजारांपैकी आतापर्यंत २६ लाख २० हजार रूपये खर्च करण्यात आले असून, ३२ लाख १६ हजार रूपये शिल्लक आहेत.
यावर्षी ३२ लाख १६ हजार रूपये अद्याप शिल्लक आहेत. आर्थिक वर्ष संपत आल्याने मार्चअखेर यांत्रिकीकरणासाठी आलेला निधी खर्च करण्यासाठी कृषी विभागाची लगबग सुरू झाली आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना यांत्रिक अवजारे खरेदीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळेच प्राप्त निधीपैकीच निधी शिल्लक राहिला आहे. सर्वसाधारण प्रवर्ग घटकासाठी १९ लाख ५६ हजार खर्च करण्यात येणार होता. मात्र, वित्तीय मान्यता नसल्यामुळे निधी परत गेला. शिवाय अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी १२.४६ हजार रूपये निधी मंजूर होता. परंतु या प्रवर्गातून यांत्रिकीकरणासाठी एकही अर्ज आला नसल्यामुळे निधी परत गेला आहे. एकूण ३२ लाख २ हजार इतका निधी परत गेला असून, शिल्लक ३२ लाख १६ हजार रूपये खर्च करण्यासाठी कृषी विभागाची धडपड सुरू आहे. (प्रतिनिधी)
कृषी उन्नत्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केल्यानंतर कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी परवानगी दिली जाते. सर्वसाधारण गटासाठी ३५ टक्के तर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त तसेच महिला शेतकऱ्यांसाठी ४० टक्के अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांनी अवजारे खरेदी केल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

Web Title: 32 lacs of agricultural mechanization in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.