रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान, कुडाळ विधानसभा मतदार संघाने घेतली आघाडी
By शोभना कांबळे | Published: May 7, 2024 01:47 PM2024-05-07T13:47:51+5:302024-05-07T13:49:05+5:30
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान झाले आहे. ...
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान झाले आहे. यावेळी कुडाळ विधानसभा मतदार संघाने आघाडी घेतली असून या मतदार संघात ४८.४४ टक्के मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ८.१७ टक्केच मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत सहाही विधानसभा मतदार संघात ४४.७३ टक्के मतदान झाले आहे. यावेळी कुडाळ विधानसभा मतदार संघात ४८.४४ टक्के मतदान झाले आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघात ४६.७२ टक्के मतदान झाले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ४१ टक्के मतदान झाले आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात ४१.६८ टक्के मतदान झाले आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात ४६.४ टक्के आणि सावंतवाडी मतदार संघात ४५.०१ टक्के मतदान झाले आहे.
दुपारी १ वाजेपर्यंत ३३.९१ टक्के मतदान
दुपारी १ वाजेपर्यंत ३३.९१ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, सर्वाधिक मतदान चिपळूण आणि राजापूर विधानसभा मतदार संघात झाले होते. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ८.१७ टक्केच मतदान झाले होते. दुपारी १ वाजेपर्यंत सहा विधानसभा मतदार संघात ३३.९१ टक्के एकूण मतदान झाले आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३७.९ टक्के मतदान झाले होते.