३५३ नवे रुग्ण, ६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:01+5:302021-07-16T04:23:01+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली असून, ३५३ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली असून, ३५३ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ६७,६०० झाली आहे. दिवसभरात ३९१ जणांनी कोरोनावर मात केल्याने, एकूण ६२,३३९ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाने ६ रुग्णांचा बळी घेतल्याने कोरोनाच्या बळींची संख्या १,९२९ झाली आहे. पॉझिटिव्हिटी दरामध्ये वाढ झाली असून ७.२९ टक्के झाला आहे.
जिल्ह्यात ४,८४५ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये ३५३ बाधित रुग्ण सापडले असून, त्यामध्ये मंडणगड तालुक्यात १ रुग्ण, दापोलीत १७, खेडमध्ये ४७, गुहागरात ३२, चिपळूणात १२७, संगमेश्वरात २४, रत्नागिरीत ७१, लांजात ११ व राजापुरात २३ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात २,९७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. गृहविलगीकरणात १,४४१ रुग्ण असून, संस्थात्मक विलगीकरणात १,५३० रुग्ण आहेत.
रत्नागिरी तालुक्यात एका १३० वयोवृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील प्रत्येकी दोन रुग्ण तर मंडणगड, संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृत्यूचे प्रमाण २.८५ टक्के असून, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, ते ९२.२२ टक्के आहे.