खेडमध्ये ३६ कंटेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:33 AM2021-04-28T04:33:28+5:302021-04-28T04:33:28+5:30

मौजे जैतापुरातील पाण्याची समस्या मिटणार खेड : तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या मौजे जैतापूर येथील ग्रामस्थांना भेडसावणारी पाण्याची ...

36 containment zones in Khed | खेडमध्ये ३६ कंटेन्मेंट झोन

खेडमध्ये ३६ कंटेन्मेंट झोन

Next

मौजे जैतापुरातील पाण्याची समस्या मिटणार

खेड : तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या मौजे जैतापूर येथील ग्रामस्थांना भेडसावणारी पाण्याची समस्या मिटणार आहे. आमदार योगेश कदम यांनी पाणी प्रश्नाला प्राधान्य देत नळपाणी पुरवठा योजनेसाठी १५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. निधीसाठी श्रीकांत शिर्के, अप्पा मोरे, बबन मोरे, माजी सरपंच बांद्रे यांनी पाठपुरावा केला.

गटाराचे पाणी रस्त्यावर

चिपळूण : शहरातील शिवाजीनगर परिसरात गटाराचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठमोठया इमारती उभ्या राहात आहेत. मात्र, त्यांचे सांडपाणी निचरा होण्याची व्यवस्था नाही, त्यातच असलेले गटारही अर्थवट बांधण्यात आले असून, तेथे सांडपाणी साचून राहात आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा खेडमध्ये फज्जा

खेड : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. शनिवार, रविवार सलग दोन दिवस बाजारपेठ पूर्णत: बंद राहिल्याने सोमवारी बाजारपेठेत नागरिकांची एकच झुंबड उडाली. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.

किल्ले रसाळगडावर पुतळा उभारणार

खेड : तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक रसाळगड किल्ला शिवभक्तांचे आकर्षण असून, या गडाच्या प्रवेशद्वाराजवळ महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असावा, ही लाखो शिवभक्तांच्या मनात तळमळ होती. घेरासाळगड गावचे सुपुत्र व शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बाबू आखाडे यांनी लाखो शिवभक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

भडगावला ५० लाखांचा निधी मंजूर

खेड : तालुक्यातील भरणे भडगाव या दोन गावांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भरणे ३० लाख व भडगाव २० लाख असा एकूण ५० लाखांचा निधी दोन गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी मंजूर केला आहे. भडगावमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून मिळावी, यासाठी माजी सभापती सुरेश उसरे यांनी मागणी केली होती.

दाभोळमध्ये लॉकडाऊनला प्रतिसाद

दाभोळ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यांना सर्व समाज घटकांचा प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे. कडक लॉकडाऊनला दाभोळमधील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून, पोलीस यंत्रणेनेसुध्दा सर्व मार्गांवर फेरफटका सुरु ठेवल्याने गर्दीवर नियंत्रण आले आहे.

Web Title: 36 containment zones in Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.