रत्नागिरीत करमणूक करापोटी वर्षभरात चार कोटीचा महसूल जमा

By admin | Published: April 19, 2017 12:47 PM2017-04-19T12:47:17+5:302017-04-19T12:47:17+5:30

कर रद्द केल्याचा फटका वसुलीला

4 crore revenue collection in Ratnagiri year | रत्नागिरीत करमणूक करापोटी वर्षभरात चार कोटीचा महसूल जमा

रत्नागिरीत करमणूक करापोटी वर्षभरात चार कोटीचा महसूल जमा

Next

आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी,दि. १९ : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेने यावर्षी ९६ टक्के उद्दिष्टपूर्ती करून ३ कोटी ३९३ लाख इतका महसूल मिळवला आहे. संगणक, मोबाईल, विविध वाहिन्या यामुळे सध्या सिनेमागृहांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटावरील करमणूक कर रद्द केल्याने या विभागाची वसुली रोडावली आहे.

जिल्हा करमणूक कर शाखेला सायबर कॅफे, व्हिडिओ खेळघर, सिनेमागृह, केबल्स आदींच्या माध्यमातून महसूल मिळतो. मात्र, संगणक, मोबाईलमुळे सायबर कॅफेची संख्या अतिशय कमी झालेली आहे. मोबाईलवर आता विविध खेळ उपलब्ध झाले असल्याने व्हिडिओ खेळघरही कालबाह्य होऊ लागले आहे. जिल्ह्यात चित्रपटगृहांची संख्याही केवळ पाच आहे. त्यामुळे यापासून मिळणारा करही कमी झाला आहे. त्यातच आता मराठी चित्रपटांवरील कर रद्द केल्याने तर इष्टांकपूर्ती होणे अवघड झाले आहे.

या शाखेला २०१६ - १७ या आर्थिक वर्षाकरिता ४ कोटी १० लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ९५.९२ टक्के इतकी उद्दिष्टपूर्ती केली आहे. सर्वाधिक वसुली लांजा तालुक्यात (११८ टक्के) झाली असून, त्याखालोखाल मंडणगड (१११ टक्के) आणि राजापूर तालुक्याने (१०० टक्के) केली आहे.

सध्या डीटीएचधारकांची संख्या वाढती असल्याने डीटीएच करापोटी २ कोटी ६५ लाख ९१ हजार इतका महसूल गोळा झाला असून, यासाठी २ कोटी ६३ लाख रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यावर्षी उद्दिष्टापेक्षा जास्त (१०१.११ टक्के) वसुली झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 4 crore revenue collection in Ratnagiri year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.