चिपळुणात ४ गावे हॉटस्पॉट जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:40+5:302021-04-29T04:23:40+5:30

चिपळूण : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. ज्या गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे, अशी गावे कोरोना हॉटस्पॉट जाहीर ...

4 hotspots announced in Chiplun | चिपळुणात ४ गावे हॉटस्पॉट जाहीर

चिपळुणात ४ गावे हॉटस्पॉट जाहीर

Next

चिपळूण : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. ज्या गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे, अशी गावे कोरोना हॉटस्पॉट जाहीर करून तिथे प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत. तालुक्यातील सध्याच्या स्थितीला पिंपळी खुर्द, चिंचघरी, वालोपे आणि पोफळी ही चार गावे प्रातांधिकाऱ्यांनी कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर केली आहेत. मात्र, या गावांत कोरोना रुग्णवाढीचा वेग नियंत्रणात राहिला आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये तालुक्यात शहरासह खेर्डी व सावर्डेचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त अन्य गावांमध्ये लॉकडाऊनबाबत काही शिथिलता देण्यात आली. त्यामुळे गावागावांत दैनंदिन व्यवहार नियमित सुरू राहिल्याने त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहे. तालुक्यात प्रथम मार्कंडी बुद्रुक गाव हॉटस्पॉट ठरले होते. येथील परिस्थिती आता पूर्वपदावर आली असून १८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यानतंर आता पोफळी, पिंपळी खुर्द, चिंचघरी व वालोपे ही चार गावे हॉटस्पॉट म्हणून जाहीर केली आहेत. या चारही गावांमध्ये आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी ग्रामपंचायती व ग्रामकृतीदलाची मदत घेतली जात आहे.

........................

पोफळी येथे हॉटस्पॉट जाहीर झाल्यानंतर महाजनकोचे अधिकारी, तसेच यंत्रणेची बैठक झाली. गावात औषध फवारणी सुरू केली आहे. महाजनको कंपनीने केंद्रात २५ बेडचा विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. कामगारांना तिथेच राहण्याची व्यवस्था केली आहे. बाधित रुग्ण वाढू नयेत, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

बाबू साळवी, पंचायत समिती सदस्य

Web Title: 4 hotspots announced in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.