रत्नागिरीत कोरोनाचे ४ हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:05+5:302021-06-25T04:23:05+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, शहरातील ४ वेगवेगळे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शहर परिसरात ...

4 hotspots of Corona in Ratnagiri | रत्नागिरीत कोरोनाचे ४ हॉटस्पॉट

रत्नागिरीत कोरोनाचे ४ हॉटस्पॉट

Next

रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, शहरातील ४ वेगवेगळे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शहर परिसरात आठवडाभराच्या कालावधीत कोरोनाचे रुग्ण वाढले असून, एकूण ३४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

काेरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी होईल, असे वाटत होते. मात्र, कडक लॉकडाऊनमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. या कालावधीत शहर परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह कोरोना चाचणीही करण्यात येत होती. त्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. त्यामुळे प्रशासनाकडून कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

सुरुवातीला कोरोना रुग्ण सापडल्यानंतर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत होते. त्याचबरोबर नगर परिषदेकडून त्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. मात्र, बाधित क्षेत्र नाही, त्यामुळे फवारणीही होत नाही.

शहरातील वेगवेगळ्या ८१ भागात ३४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये ज्या भागात १५पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, ते भाग आरोग्य विभागाकडून कोरोना हॉटस्पॉट जाहीर करण्यात येतात. त्यामध्ये रत्नागिरी बाजारपेठ, टिळक आळी, शिवाजीनगर, परटवणे यांचा समावेश आहे. तर गवळीवाडा, जोशी पाळंद, माळनाका, मारुती मंदिर, साळवी स्टॉप, सहकार नगर, थिबा पॅलेस, उद्यमनगर, झाडगाव, कोकणनगर आदी भागातही जास्त रुग्ण आहेत. त्यामुळे या सर्व भागांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.

रत्नागिरी शहरातील हॉटस्पॉट

रत्नागिरी बाजारपेठ

टिळक आळी

शिवाजीनगर

परटवणे

Web Title: 4 hotspots of Corona in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.