पाच पोलीस कुटुंबातील ४0 जणांना डेंग्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 03:32 PM2020-05-13T15:32:00+5:302020-05-13T15:32:31+5:30

कोरोनाशी लढतानाच दापोलीत पाच पोलीस कुटुंबांतील ४0 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. कोरोना लढ्यात मोठे काम करणाऱ्या पोलिसांबाबतच्या या प्रकारामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

40 members of five police families get dengue | पाच पोलीस कुटुंबातील ४0 जणांना डेंग्यू

पाच पोलीस कुटुंबातील ४0 जणांना डेंग्यू

googlenewsNext
ठळक मुद्देपाच पोलीस कुटुंबातील ४0 जणांना डेंग्यूमच्छीमार्केट व परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अळ्या

दापोली : कोरोनाशी लढतानाच दापोलीत पाच पोलीस कुटुंबांतील ४0 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. कोरोना लढ्यात मोठे काम करणाऱ्या पोलिसांबाबतच्या या प्रकारामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

दापोलीत कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे दापोली शहरात डेंग्यू या आजाराने शिरकाव केला आहे. पोलीस वसाहतीतील पाच कुटुंबातील व्यक्तिंना डेंग्यूची लागण झाली आहे

दापोलीतील काही भागांमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसून आली. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगर पंचायतीने शहरातील काही भागांची पाहणी करून फवारणी केली आहे. या भागात डेंग्युसदृश अळ्या आहेत का, याची पाहणी करण्यात आली.

मच्छीमार्केट व परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. कोरोनाच्या रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभाग डेंग्यू संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करत नसल्याची खंत दापोली नगर पंचायतीचे आरोग्य सभापती मंगेश राजपूरकर यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: 40 members of five police families get dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.