रत्नागिरीत ५० हजारांची ऑनलाईन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 05:34 PM2019-10-09T17:34:55+5:302019-10-09T17:36:33+5:30

ऑनलाईन खरेदीसाठी भरलेली रक्कम ५११ रुपये परत देण्याच्या बहाण्याने झीपर शॉप या वेबसाईटच्या कस्टमर केअर नं.९३३०९५४७३१ वरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्टेट बॅँक ऑफ इंडिया शाखा साळवी स्टॉप, रत्नागिरीमधील खाते नंबर व त्याचा तपशील मागूून घेतला. त्यादवारे त्याने नाचणेतील व्यक्तीची तब्बल ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

4,000 online frauds in Ratnagiri | रत्नागिरीत ५० हजारांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरीत ५० हजारांची ऑनलाईन फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरीत ५० हजारांची ऑनलाईन फसवणूकअज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : ऑनलाईन खरेदीसाठी भरलेली रक्कम ५११ रुपये परत देण्याच्या बहाण्याने झीपर शॉप या वेबसाईटच्या कस्टमर केअर नं.९३३०९५४७३१ वरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्टेट बॅँक ऑफ इंडिया शाखा साळवी स्टॉप, रत्नागिरीमधील खाते नंबर व त्याचा तपशील मागूून घेतला. त्यादवारे त्याने नाचणेतील व्यक्तीची तब्बल ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

परत मिळणारी ५११ रुपये रक्कम खात्यात जमा करण्यासाठी झीपर वेबसाईटच्या कस्टमर केअरमधून एका अनोळखी व्यक्तीचा फोन पंकज शशिकांत दळवी (२६, औषध प्रतिनिधी (एमआर) सौभाग्यनगर, नाचणेरोड, रत्नागिरी) यांना आला. त्या व्यक्तीने पंकज यांच्याकडून बॅँक खाते नंबर व अन्य तपशील घेतला.

त्यानंतर काहीवेळाने पंकज यांच्या खात्यातील ४९९९८ रुपये रक्कम काढल्याचा संदेश त्याच्या मोबाईलवर आला. त्या अनोळखी व्यक्तीने या खात्यातील ४९,९९८ रुपये काढून घेतले व फसवणूक केली. याबाबतची तक्रार पंकज दळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२०, ४०३, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) नुसार मंगळवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 4,000 online frauds in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.