पाच एकर क्षेत्रावर ४० हजार हळद रोपांची हाेणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:29 AM2021-05-01T04:29:55+5:302021-05-01T04:29:55+5:30

मंडणगड : जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती, मंडणगड कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड तालुक्यात प्रथमच हळद लागवडीचा नावीन्यपूर्ण ...

40,000 turmeric seedlings will be planted on five acres | पाच एकर क्षेत्रावर ४० हजार हळद रोपांची हाेणार लागवड

पाच एकर क्षेत्रावर ४० हजार हळद रोपांची हाेणार लागवड

Next

मंडणगड : जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती, मंडणगड कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड तालुक्यात प्रथमच हळद लागवडीचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून हळकुंडापासून ४० हजार हळदीचे रोपे प्रो-ट्रेमध्ये तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे ५ एकर क्षेत्रावर विविध शेतकऱ्यांच्या शेतावर हळद लागवड करण्यात येणार असून हा ‘पथदर्शक प्रकल्प’ असल्याची माहिती पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून देण्यात आली.

सन २०२१ च्या खरीप हंगामात पंचायत समिती, मंडणगड कृषी विभागाने जिल्हा परिषदेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. गेली ३-४ महिने या प्रकल्पाबाबतची माहिती शेतकऱ्यांना देऊन याबाबतचे प्राथमिक माहिती वजा प्रशिक्षणही पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांना देण्यात आले. ज्या इच्छुक शेतकऱ्यांनी हळद लागवड करण्यास सहमती दर्शवली व पंचायत समितीकडे नोंदणी केली, त्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने सुमारे ५ एकर क्षेत्रावर हळदीची लागवड होणार आहे. कमीत कमी १ गुंठा ते जास्तीत जास्त १० गुंठे क्षेत्र लागवडीसाठी निवडण्यात आलेले आहे. या प्रकल्पाला संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन पंचायत समितीच्या कृषी विभागाचे कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी) हे करणार आहेत. मंडणगड तालुक्यात प्रथमच अशाप्रकरचा हळद लागवडीचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून हळकुंडापासून ४० हजार हळदीचे रोपे प्रो-ट्रेमध्ये तयार करण्याचे काम कुंबळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात समीक्षा लोखंडे यांच्या रोपवाटिकेत पूर्ण झाले आहे. हळकुंडापासून रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन कृषी अधिकारी विशाल जाधव, विस्तार अधिकारी (कृषी) गजेंद्र पौनीकर व पवन गोसावी यांनी केले आहे. हा ‘पथदर्शक प्रकल्प’ यशस्वी करण्यासाठी सभापती स्नेहल सकपाळ, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली आहे.

....................

हळदीचे वाण

पथदर्शक प्रकल्पात आबलोली (ता. गुहागर) येथील प्रगतिशील शेतकरी सचिन कारेकर यांनी गेल्या १५ वर्षांच्या प्रयत्नाने निवड पद्धतीने ‘स्पेशल कोकण’ हे हळदीचे वाण विकसित केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम प्रकारे होऊ शकणाऱ्या हळदीच्या वाणाचा उपयोग करण्यात येणार आहे.

Web Title: 40,000 turmeric seedlings will be planted on five acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.