चिपळुणात ४४ उमेदवारांचे अर्ज दाखल
By admin | Published: February 6, 2017 12:40 AM2017-02-06T00:40:54+5:302017-02-06T00:40:54+5:30
आतापर्यंत ८८ अर्ज : जिल्हा परिषदेसाठी १४ व पंचायत समितीसाठी ३० नामनिर्देशन पत्रे
अडरे : चिपळूण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज (रविवारी) पाचव्या दिवशी एकूण ४४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी १४ तर पंचायत समितीसाठी ३० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यावेळी प्रांत कार्यालयाबाहेर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली
होती.
आज मालदोली जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेकडून मयुरी शिर्के, पेढे गटासाठी शिवसेनेकडून दीप्ती महाडिक, भाजपकडून अर्चना थत्ते, खेर्डी गटासाठी शिवसेनेकडून सुजाता खेडेकर, अलोरे गटासाठी भाजपकडून हेमंत करंजवेकर, पोफळी गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मीरा खेतले, सावर्डे गटासाठी राष्ट्रवादीकडून युगंधरा राजेशिर्के, भारिप बहुजन महासंघातर्फे मुजफ्फर मुल्लाजी, भाजपतर्फे तानाजी लाखण, रामपूर गटासाठी शिवसेनेतर्फे ऋतुजा खांडेकर, कळंबट गटासाठी राष्ट्रवादीतर्फे निकीता सुर्वे, राष्ट्रवादीतर्फे आदिती मोहिते, शिवसेनेतर्फे रश्मी दळवी, कोकरे गटासाठी भाजपतर्फे स्नेहा चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
तर पंचायत समिती मालदोली गणासाठी भाजपतर्फे सुरेश गोलमडे, कोंढे गणासाठी राष्ट्रवादीतर्फे अनिल चिले, शिवसेनेतर्फे सुनील तटकरे, पेढे गणासाठी शिवसेनेतर्फे ऋतुजा पवार, नांदिवसे गणासाठी भाजपतर्फे गणेश गजमल, खेर्डी गणासाठी शिवसेनेतर्फे अनिल दाभोळकर, कापसाळ गणासाठी अपक्ष अंजली गमरे, शिवसेनेतर्फे सुप्रिया जाधव, अलोरे गणासाठी काँग्रेसतर्फे रवींद्र भुवड, भाजपतर्फे विनोद सुर्वे, ओवळी गणासाठी भाजपतर्फे सानिया शिंदे, टेरव गणासाठी भाजपतर्फे मानसी कदम, पोफळी गणासाठी राष्ट्रवादीतर्फे अभिषेक साळवी, सावर्डे गणासाठी राष्ट्रवादीतर्फे पूजा निकम, भाजपतर्फे पूनम जाधव, दहिवली बुद्रुक गणासाठी राष्ट्रवादीतर्फे मानसिंग महाडिक, राष्ट्रवादीतर्फे नयन सुर्वे, भाजपतर्फे सतीश घाग, रामपूर गणासाठी शिवसेनेतर्फे अनुजा चव्हाण, कळंबट गणासाठी शिवसेनेतर्फे संजिवनी खापरे, भाजपतर्फे भाग्यश्री पडवळकर, राष्ट्रवादीतर्फे आदिती भागडे, राष्ट्रवादीतर्फे प्रज्ञा बळकटे, मुर्तवडे गणासाठी शिवसेनेतर्फे संजीवनी जावळे, भाजपतर्फे सानवी भागडे, राष्ट्रवादीतर्फे सुप्रिया निवाते, राष्ट्रवादीतर्फे संचिता केंबळे, कोकरे गणासाठी भाजपतर्फे निकीता निर्मळ व कुटरे गणासाठी भाजपतर्फे वसंत झोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी चिपळूण तालुक्यात एकूण ८८ अर्ज दाखल झाले आहेत. यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. सोमवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. (वार्ताहर)