लांजात एकाच दिवशी आढळले ४५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:32+5:302021-06-22T04:21:32+5:30
लांजा : गेले दोन दिवस कोरोना रुग्णांमध्ये घट झालेली असतानाच रविवारी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. रविवारी ...
लांजा : गेले दोन दिवस कोरोना रुग्णांमध्ये घट झालेली असतानाच रविवारी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. रविवारी एका दिवसामध्ये तालुक्यात कोरोनाचे ४५ रुग्ण आढळले.
यामध्ये अँटिजन चाचणीत १८ तर कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील २७ जण असा एकूण ४५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये मठ बौध्दवाडी १, व्हेळ सडेवाडी १४, साटवली ३, खेरवसे १, तळवडे मालदारवाडी ८, लावगण मांडवकरवाडी २, धावणेवाडी २, लांजा - बौध्दवाडी १, लांजा शहर १, लांजा न्हावीवाडी १, लांजा बाजारपेठ १, साटवली बौध्दवाडी १, लांजा शासकीय विश्रामगृह २, लांजा पानगलेवाडी २, हर्चे ५ येथील रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ३,०२५ झाली आहे. आतापर्यंत २,३३३ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात ५८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.