४८ हजार देयकांचा निपटारा
By admin | Published: April 24, 2016 12:37 AM2016-04-24T00:37:57+5:302016-04-24T00:37:57+5:30
कोषागार कार्यालय : २६०३ कोटींची रक्कम मार्चअखेर खर्च
रत्नागिरी : जिल्हा कोषागार कार्यालयाने ३१ मार्चअखेर विविध विभागांच्या विविध प्रकारच्या ४७,९७६ देयकांचा निपटारा केला आहे. गेल्या वर्षभरात या बिलांपोटी २६०३ कोटी एवढ्या रकमेची देयके या कार्यालयाकडून खर्ची टाकण्यात आली आहेत.
जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सार्वजनिक बांधकाम, वन विभाग आणि पाटबंधारे हे तीन विभाग वगळता जिल्ह््यातील आरोग्य, कृषी, शिक्षण तसेच जिल्हा परिषद, आदी २३५ कार्यालयांमधील विविध बिले सादर केली जातात. यात पगार बिले, प्रवास भत्ता, कार्यालयीन खर्चाची बिले, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक देयके, कार्यालयीन खर्च, लाईट, फोनबिल, सेवानिवृत्तांचे वेतन, आदी आर्थिक व्यवहार या कार्यालयाकडून केले जातात.
सार्वजनिक बांधकाम, वन विभाग आणि पाटबंधारे या तीन विभागांची देयके ही राष्ट्रीयकृत बँकांमधून दिली जातात. मार्च महिना सुरू झाला की, सर्वच कार्यालयांची वर्षाचा निधी खर्ची पडावा आणि त्याची बिले मिळावी तसेच पगार वेळेत व्हावेत यासाठी तारांबळ सुरू असते. मार्च अखेरीस ही सर्व देयके कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यासाठी ही सर्व कार्यालये धावपळ करत
असतात.
यावर्षीही विविध प्रकारची ४७,९७६ देयके जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात आली होती. यावर्षी राज्य तसेच केंद्र सरकारकडूनच निधीला कात्री लावण्यात आली होती. तसेच जेवढा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च होईल, तेवढाच निधी या सर्व विभागांकडे देण्यात आल्याने यावर्षी देयकांची संख्या कमी झाली. त्यामुळे यंदा कामात सुटसुटीतपणा आला आहे.
कोषागार कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्याने शेवटच्या टप्प्यात या कर्मचाऱ्यांची धांदल उडाली होती. मात्र, शासनाच्या ‘बीडीएस’ प्रणालीमुळे कामाचा निपटारा लवकर होण्यास मदत झाली तसेच कामाचा तेवढा ताण कर्मचाऱ्यांवर आला नाही, असे जिल्हा कोषागार अधिकारी पी. जे. यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्हा कोषागार कार्यालयाकडून एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ अखेर प्रत्येक महिन्यात खर्ची टाकण्यात आलेल्या देयकांची संख्या आणि रक्कम.
महिनादेयकांचीरक्कम संख्या(कोटीत)
एप्रिल३१८८२८१
मे१९५७१४८
जून२९५४१३३
जुलै३७३३२३२
आॅगस्ट३६४६२२८
सप्टेंबर३५३८१५२
आॅक्टोबर४१०१२००
नोव्हेंबर४८८२१९८
डिसेंबर३७९६२२८
जानेवारी३४७८१७४
फेब्रुवारी४०७२२१६
मार्च८६३१४१२