दापोली नगर पंचायतीत ५ कोटींचा अपहार, संशयित लेखापालवर गुन्हा दाखल; आकडा वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 07:04 PM2022-10-11T19:04:49+5:302022-10-11T19:05:21+5:30

स्वतःच्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या निधीचा अपहार केल्याचे सिद्ध

5 crore embezzlement in Dapoli Nagar Panchayat, A case has been registered against the suspected accountant | दापोली नगर पंचायतीत ५ कोटींचा अपहार, संशयित लेखापालवर गुन्हा दाखल; आकडा वाढण्याची शक्यता

दापोली नगर पंचायतीत ५ कोटींचा अपहार, संशयित लेखापालवर गुन्हा दाखल; आकडा वाढण्याची शक्यता

googlenewsNext

शिवाजी गोरे

दापोली : दापोली नगर पंचायतीचे तत्कालीन लेखापाल दीपक सावंत यांनी सुमारे ५ कोटी ८१ लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात दीपक दिलीप सावंत (४४, रा. काळकाई कोंड, दापोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नगर पंचायतीचे लेखापाल सिद्धेश विश्वनाथ खामकर यांनी फिर्याद दिली आहे. दापोली नगर पंचायतीचे तत्कालीन लेखापाल सावंत यांनी आर्थिक वर्ष २०२१ ते २०२२ या कालावधीत हा अपहार केल्याचे कार्यालयीन चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाले आहे. उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांनी हा अपहार उघड करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

सावंत २००३ पासून दापोली नगर पंचायतीमध्ये लेखापाल या पदावर रुजू होते. या कालावधीत त्यांनी दापोली नगर पंचायतीच्या विविध बँक खात्यांतील दोन कॅशबुक तयार केली होती. त्यांनी दिनांक १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत दापोली नगर पंचायतीच्या विविध खात्यांमध्ये शासनाकडून आलेल्या विविध निधीतून व दापोली नगर पंचायतीच्या स्वनिधी खात्यातून रक्कम वर्ग केली. स्वतःच्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या निधीचा अपहार केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधीक्षक शशिकिरण काशीद यांच्या कार्यालयाकडेही बिनतारी फिर्याद देण्यात आली आहे.

Web Title: 5 crore embezzlement in Dapoli Nagar Panchayat, A case has been registered against the suspected accountant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.