आरोग्यासाठी पोलिस दलातर्फे ५ किलोमीटरची फिटनेस दाैड; रत्नागिरी पोलिस मुख्यालयात ‘फिट राइज ७५’ चा शुभारंभ
By शोभना कांबळे | Published: October 28, 2023 02:34 PM2023-10-28T14:34:55+5:302023-10-28T14:35:12+5:30
रत्नागिरी पोलिस मुख्यालयात ‘फिट राइज ७५’ चा शुभारंभ
शोभना कांबळे
रत्नागिरी : येथील पोलिस दलातर्फे ७५ दिवसांच्या फिटनेस कार्यक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी झाला. यानिमित्त पोलीस मुख्यालय-जयस्तंभ-भाट्ये पूल-नारळ संशोधन केंद्र व परत पोलीस मुख्यालय अशा ५ किलोमीटरच्या फिटनेस दौड मध्ये १६ पोलीस अधिकारी व ११५ पोलीस अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या व केंद्रीय गृह मंत्री, अमित शहा यांच्या हस्ते ‘फिट राइज ७५’ या ७५ दिवसीय फिटनेस कार्यक्रमाचे ‘फ्लॅग ऑफ समारंभ’ शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी झाला.
‘फिट राइज ७५’ हा एक निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी पोलीस अधिकारी-अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसाठी ७५ दिवसांचा विविध फिटनेस आव्हाने असलेला कार्यक्रम असून, त्या अनुषंगाने, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाज़ता पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते ‘फिट राइज ७५’ या फिटनेस कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
पोलीस मुख्यालय-जयस्तंभ-भाट्ये पूल-नारळ संशोधन केंद्र व परत पोलीस मुख्यालय अशा ५ किलोमीटरच्या या फिटनेस दौडमध्ये १६ पोलीस अधिकारी व ११५ पोलीस अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.