गुहागरात अतिवृष्टीमुळे ५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:40+5:302021-07-16T04:22:40+5:30
गुहागर : तालुक्यात गेले पाच दिवस काेसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तब्बल ५ लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद तहसील ...
गुहागर : तालुक्यात गेले पाच दिवस काेसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तब्बल ५ लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद तहसील कार्यालयात झाली आहे.
तालुक्यात ११ जुलै राेजी ८३ मिलिमीटर, १२ जुलै राेजी १५६, १३ राेजी १७६, १४ राेजी ९४, १५ राेजी ७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये १२ व १३ जुलै राेजी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे पडवे येथील वसंत गणपत राऊत यांची एक म्हैस पुरात वाहून मृत झाली तर दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. यामध्ये तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वेळणेश्वर वाडदई येथील कल्पना कृष्णा जोशी यांचे घर पूर्णत: काेसळून ३ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अंजनवेल सुतारवाडी येथील अशोक धाकटू कुरधुंडकर यांच्या घरावर व शेडवर आंब्याचे मोठे झाड कोसळून ७६ हजार ९१० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद तहसील कार्यालयात झाली आहे. भातशेतीची लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली असताना अति पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी लावणीची कामे थांबविली आहेत. अति पावसामुळे नुकतीच लावलेली रोपे पाण्यामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
-------------------------------------------
अतिवृष्टीमुळे गुहागर तालुक्यातील अंजनवेल सुतारवाडी येथील आंब्याचे झाड मुळासकट पडून अशोक धाकटू कुरधुंडकर यांच्या घराचे व पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले आहे. (छाया : संकेत गाेयथळे)