खेड शहरातील ५०३ घरे पूर प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:15+5:302021-06-16T04:42:15+5:30
खेड : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी नगर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील दोन प्रभागातील ५०३ घरांचा ...
खेड : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी नगर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील दोन प्रभागातील ५०३ घरांचा पूर प्रभावित घरे म्हणून समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणची लोकसंख्या २,५१५ इतकी असून, त्यादृष्टीने उपाययोजना राबवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
अतिवृष्टी झाल्यास जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडते. त्यानंतर पुराचे पाणी हळूहळू बाजारपेठेत घुसते. संभाव्य पूरपरिस्थिती चा धोका लक्षात घेत नगर प्रशासनाने उपाययोजनांचा अवलंब केला आहे. शहरातील मटण, मच्छी मार्केट, सफा मशीद चौक, साठे मोहल्ल्याचा काही भाग, पौत्रिक मोहल्ला, तांबे मोहल्ला, गांधी चौक, निवाचा, वाल्की गल्ली, गुजरआळीचा काही भाग पान गल्ली, बाजारपेठ, खांबतळे, नगर परिषद कार्यालय, तीन बत्ती नाका, खेड-दापोली रोड, ब्राह्मणवाडी, कासारवाडी, सोनारआळीचा काही भाग साळीवाडा भाग पूर प्रभावित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आहे.