जिल्ह्यात कोरोनाचे ५३ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:49+5:302021-09-16T04:39:49+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे ५३ नवे रुग्ण आढळले आहेत. दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ५७ बाधित रुग्ण बरे ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे ५३ नवे रुग्ण आढळले आहेत. दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ५७ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. १,२७३ रुग्णांवर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत.
गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात लाखो चाकरमानी आलेले असतानाही आरोग्य विभागाकडून काेरोना चाचण्या करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. दिवसभरात २,२३३ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आरटीपीसीआर चाचणीत ३१ रुग्ण, तर ॲन्टिजन चाचणीत ३३ जण पॉझिटिव्ह आले. त्यात मंडणगड तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. दापोली, गुहागर, राजापूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला. खेड तालुक्यात दोन रुग्ण, चिपळुणात ८, संगमेश्वरात ११, रत्नागिरीत सर्वांत जास्त २५, तर लांजातील चार रुग्ण सापडले आहेत. एकूण रुग्ण ७७,११४ झाले आहेत.
जिल्ह्यात रत्नागिरी आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २,३७६ झाली आहे. बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ३.८ टक्के आहे. एकूण ७३,४६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२७ टक्के आहे.