जिल्ह्यात कोरोनाचे ५३८ रुग्ण, १७ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:25+5:302021-06-11T04:22:25+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, गेल्या २४ तासांत ५३८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, गेल्या २४ तासांत ५३८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ४२,३५९ झाली आहे, तर १७ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला असून, एकूण १,४४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३७५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने एकूण ३६,१२० रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण ४,६९४ आहेत. दिवसभरात कोरोना चाचणीमध्ये ३,१५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वांत जास्त १७९ रुग्ण, तर मंडणगडात सर्वांत कमी ९ रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये दापोली तालुक्यात १८ रुग्ण, खेडमध्ये २५, गुहागरात २८, चिपळुणात ६८, संगमेश्वरात ६०, लांजात ६२ आणि राजापूरमधील ७७ रुग्णांचा समावेश आहे. बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण १७.६३ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.४७ टक्के आहे.
दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत असून, त्यांचे प्रमाण ३.४१ टक्के आहे. मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ५, राजापुरातील ४, चिपळुणातील ३, लांजातील २, खेड, गुहागर आणि संगमेश्वरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.