५५ लाखांच्या निधीतून खरेदी केलेले अग्निशामक वाहन सेवेसाठी तत्पर; उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

By शोभना कांबळे | Published: May 18, 2023 01:16 PM2023-05-18T13:16:45+5:302023-05-18T13:16:55+5:30

रत्नागिरी नगरपरिषदेला नवीन अग्निशामक वाहन खरेदीसाठी ५५ लाख रुपये मंजूर झाले होते.

55 lakhs fund procured fire fighting vehicle ready for service; Launched by Industries Minister Samant | ५५ लाखांच्या निधीतून खरेदी केलेले अग्निशामक वाहन सेवेसाठी तत्पर; उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

५५ लाखांच्या निधीतून खरेदी केलेले अग्निशामक वाहन सेवेसाठी तत्पर; उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

googlenewsNext

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियानांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अग्निशामक वाहनाचे गुरुवार, दिनांक १८ रोजी पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पूजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव,  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.     
रत्नागिरी नगरपरिषदेला नवीन अग्निशामक वाहन खरेदीसाठी ५५ लाख रुपये मंजूर झाले होते. या अनुदानातून रत्नागिरी नगर परिषदेने नवीन अग्निशमन वाहन खरेदी केले आहे. या वाहनाची पाणी साठवणूक क्षमता ५ हजार लिटर असून त्यात फोम वापराचीही सुविधा आहे.

Web Title: 55 lakhs fund procured fire fighting vehicle ready for service; Launched by Industries Minister Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.