रत्नागिरी जिल्ह्यात ५५ टक्के लागवड पूर्ण

By Admin | Published: July 15, 2017 02:44 PM2017-07-15T14:44:34+5:302017-07-15T14:44:34+5:30

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने लागवडीच्या कामाला विलंब

55% plantation completed in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यात ५५ टक्के लागवड पूर्ण

रत्नागिरी जिल्ह्यात ५५ टक्के लागवड पूर्ण

googlenewsNext


आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. १५ : कोकणातील भातशेती पावसाच्या पाण्यावर लागवड अवलंबून आहे. मात्र, यावर्षी एकूणच पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने लागवडीच्या कामाला विलंब होत आहे. जिल्ह्यात सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यावर्षी आतापर्यंत सरासरी ११७६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. ८ आणि ९ जुलै रोजी चांगला पाऊस झाला. मात्र, पुन्हा वातावरणात बदल झाला आहे. कडकडीत ऊन पडत असल्यामुळे पंपाच्या पाण्यावर लागवडीची कामे उरकावी लागत आहेत.

जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, ७० हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली जाते. पैकी आतापर्यंत ५०४६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येते. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जात असली तरी आतापर्यंत ३१९५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तृणधान्यापैकी वरीची लागवड २८५ हेक्टरवर करण्यात आली आहे. ८१० हेक्टर क्षेत्रावर कडधान्य लागवड केली आहे.

जिल्ह्यात ११८० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात येते. पैकी ७१४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण ९९ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात येत असली तरी आतापर्यंत ५४ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असल्याने ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण सुरूवातीपासून कमी राहिले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३५० ते ४०० मिलिमीटर पावसाचा फरक राहिल्याने कोरडा पावसाळा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात सिंचनाचे मोठे प्रकल्प नसल्यामुळे उपलब्ध विहिरी, नदी, बंधारे व पाटाच्या पाण्यावर लागवडीची कामे सुरू आहेत. दिवसातून एखादी सर कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी पंपाचा वापर करावा लागत आहे. पाण्याअभावी डोंगर, व कातळावरील शेतीची कामे रखडली आहेत. पाण्याची सुविधा नसलेल्या ठिकाणी मात्र शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत असून, पावसामुळे अनेक कामे खोळंबली आहेत.

Web Title: 55% plantation completed in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.