जिल्ह्यात ५७६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण, १३ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:32 AM2021-05-10T04:32:21+5:302021-05-10T04:32:21+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात ५७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या २६,९६१ झाली आहे. तर कोरोनाने १३ रुग्णांचा बळी ...
रत्नागिरी : जिल्ह्यात ५७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या २६,९६१ झाली आहे. तर कोरोनाने १३ रुग्णांचा बळी घेतला असून मृतांची संख्या ८०४ झाली आहे. ९३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून एकूण २०,७७७ रुग्ण बरे झाले आहेत. रविवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या दिवसभरात पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांपेक्षा असूनही रत्नागिरीकरांसाठी समाधानकारक बाब आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाली असल्याने आरोग्य यंत्रणेकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्ण बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा कमी मिळत आहेत. रविवारी दिवसभरात ९३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते ७७.६ टक्के आहे. त्याखालोखाल मृतांची संख्याही कमी झाली असून ती १३ वर आली आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण २.९८ टक्के झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात आजही सर्वात जास्त ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून लांजामध्ये २, दापोली, गुहागर, संगमेश्वर, मंडणगड, खेड आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये ८ महिला असून ५ पुरुष रुग्ण आहेत. ४० वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला असून उर्वरित पन्नाशीच्या वरील वयोगटातील आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अँटिजन चाचणीतील २२६ तर आरटीपीसीआर चाचणीतील ३५० रुग्ण आहेत. मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील सर्वात जास्त रुग्ण असतानाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्येही २६० रुग्ण असून ही संख्या इतर तालुक्यांपेक्षा अधिक आहे. तर दापोलीत २७ रुग्ण, खेडमध्ये ३०, गुहागरात ४९, चिपळूणात ६२, संगमेश्वरात ६०, लांजात ४१, राजापुरात ४७ आणि मंडणगडमध्ये दिवसभरात एकही रुग्ण सापडलेला नाही. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १६.३९ टक्के आहे. जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण ५,३८० आहेत.