जिल्ह्यात कोरोनाचे ५९४ नवे रुग्ण, १३ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:23 AM2021-06-18T04:23:02+5:302021-06-18T04:23:02+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित ५९४ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्ण ४६ हजार ५३० झाले आहेत. तर कोरोनाने १३ ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित ५९४ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्ण ४६ हजार ५३० झाले आहेत. तर कोरोनाने १३ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आजपर्यंत १,५७४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ८.८७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ८.८७ टक्के जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये रत्नागिरी तालुक्याचा रुग्णांप्रमाणेच पॉझिटिव्हिटी दरही सर्वात जास्त १८.७४ टक्के आहे तर मंडणगड तालुक्यात सर्वात कमी रुग्ण असले तरी पॉझिटिव्हिटी दर १३.११ टक्के आहे. हा दर इतर ८ तालुक्यांपेक्षा जास्त आहे. दापोली - ६.५६ टक्के, खेड - ३.८५ टक्के, गुहागर - ३.१८ टक्के, चिपळूण - १०.७९ टक्के, संगमेश्वर - ५.७२ टक्के, लांजा - १२.८४ टक्के आणि राजापूर - ७.९५ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे.
जिल्ह्यात ५,५६० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ४९३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मागील १०१ असे एकूण ५९४ रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ८ रुग्ण, दापोलीत २४ रुग्ण, खेडमध्ये २७, चिपळुणात १०२, गुहागरात १४, संगमेश्वमध्ये ८०, रत्नागिरीत १५८, लांजात ४२ आणि राजापुरातील ३८ रुग्णांचा समावेश आहे.
रत्नागिरी तालुक्यात कोरोनाने ११ रुग्णांचा तर संगमेश्वर आणि दापोलीत प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा दर ३.३८ टक्के आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविल्याने जास्त रुग्ण सापडत आहेत.