शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, रत्नागिरी जिल्ह्यातील ५९६ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र
By मेहरून नाकाडे | Updated: July 3, 2024 19:34 IST2024-07-03T19:34:35+5:302024-07-03T19:34:51+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (पाचवी) आणि उच्च माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परिक्षांचा निकाल बुधवारी (दि.३) ...

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, रत्नागिरी जिल्ह्यातील ५९६ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र
रत्नागिरी : महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (पाचवी) आणि उच्च माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परिक्षांचा निकाल बुधवारी (दि.३) जाहीर झाला. रत्नागिरी जिल्हय़ातून इयत्ता पाचवीच्या वर्गातील ८ हजार ८३ विद्यार्थी बसले होते, पैकी २ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता आठवीचे पाच हजार ३८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी, ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परिक्षेत इयत्ता पाचवीतील २९० तर आठवीतील ३०६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्य़ातून शिष्यवृत्ती परिक्षेसाठी इयत्ता पाचवीतून ८ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी ८०८३ विद्यार्थी उपस्थित होते. एकूण २२२३ विद्यार्थी पात्र तर ४०५० विद्यार्थी अपात्र ठरले. पात्रतेची टक्केवारी २७.५१ टक्के इतकी आहे.
आठवीतील पाच हजार ११४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होते, परीक्षेसाठी ५०३८ विद्यार्थी उपस्थित होते. एकूण ९८८ विद्यार्थी पात्र तर ५८६० विद्यार्थी अपात्र ठरले असून पात्रतेची टक्केवारी १९.६२ इतकी आहे.