जिल्ह्यात ६० कोरोना पॉझिटिव्ह नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:28 AM2021-04-05T04:28:04+5:302021-04-05T04:28:04+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, २४ तासांत ६० रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११,४३८ झाली ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, २४ तासांत ६० रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११,४३८ झाली आहे, तर १०३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आजपर्यंत १०,३५६ रुग्ण बरे झाले आहेत. एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात २५४ जणांची कोरोना तपासणी झाली असून, त्यापैकी १९४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीतील २७ रुग्ण आणि अँटिजन तपासणीतील ३३ रुग्ण आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त २८ रुग्ण, दापोलीमध्ये ५, चिपळुणात ९, संगमेश्वर, राजापुरात प्रत्येकी ६ रुग्ण, खेड, गुहागरमध्ये प्रत्येकी २ रुग्ण, मंडणगड, लांजातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात गृह अलगीकरणात २८८ रुग्ण असून, वेगवेगळ्या रुग्णालयात ५४८ रुग्ण उपचार घेत आहेत.