जिल्ह्यातील ६० शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:37 AM2021-09-07T04:37:53+5:302021-09-07T04:37:53+5:30
दर्गा परिसराचे सुशोभिकरण राजापूर : शहरातील रानतळे येथील मेहंदी पीर रिफाई दर्गा परिसराचे नगराध्यक्ष ॲड. जमीर खलफे यांनी स्वखर्चाने ...
दर्गा परिसराचे सुशोभिकरण
राजापूर : शहरातील रानतळे येथील मेहंदी पीर रिफाई दर्गा परिसराचे नगराध्यक्ष ॲड. जमीर खलफे यांनी स्वखर्चाने सुशोभिकरण केले आहे. दर्गा परिसरात पेव्हर ब्लाॅक बसविण्यात आले आहेत. परिसरातील पाण्याची वाहिनी बदलण्यात आली आहे. लवकरच रानतळेला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र शहराला जोडले जाणार आहे.
स्पर्धेचा निकाल जाहीर
रत्नागिरी : क्रीडा भारतीतर्फे आयोजित रोप स्कीपिंग स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. बारा वर्षाखालील मुलांच्या गटात हर्ष पवार, नीरज साप्ते, गोविंद नागरगोजे तर मुलींच्या गटात अवनी वैद्य, स्वरा साखळकर, वैदेही कामेरकर यशस्वी ठरले आहेत. विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देण्यात आली.
महामार्गाची दुरवस्था
रत्नागिरी : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे, बाजूपट्ट्यांवर गवत व गटारांमध्ये झाडेझुडपे वाढल्याने वाहन चालवताना त्रास होत आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी रत्नागिरीकडे येणाऱ्या मुंबईकरांना मुंबई - गोवा महामार्गासह पुणेमार्गे आंबा घाट रत्नागिरी हा छोट्या वाहनांसाठी सोयीचा मार्ग आहे. मात्र, त्याचीही दुरवस्था झाली आहे.