६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा रत्नागिरी केंद्रातून 'तथास्तु' प्रथम

By मेहरून नाकाडे | Published: December 20, 2023 07:16 PM2023-12-20T19:16:56+5:302023-12-20T19:17:07+5:30

रत्नागिरी : ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत चिपळूण-मालवण वेंगुर्ला केंद्रातून श्रीरंग ( रत्नागिरी ) या संस्थेच्या ...

62nd Maharashtra State Amateur Marathi Drama Competition Tathastu from Ratnagiri Center stands first | ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा रत्नागिरी केंद्रातून 'तथास्तु' प्रथम

६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा रत्नागिरी केंद्रातून 'तथास्तु' प्रथम

रत्नागिरी : ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत चिपळूण-मालवण वेंगुर्ला केंद्रातून श्रीरंग (रत्नागिरी) या संस्थेच्या 'तथास्तू' या नाटकाला प्रथम पारितोषिक  जाहीर झाले आहे. तसेच राधाकृष्ण कलामंच (रत्नागिरी) या संस्थेच्या 'वॅट नाईट' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. 

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे चिपळूण-मालवण वेंगुर्ला केंद्रावरील निकाल बुधवारी (दि.२०) जाहीर करण्यात आला. अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

स्वराध्या फाऊंडेशन (मालवण ) या संस्थेच्या एक्सपायरी डेट या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक भाग्येश खरे (नाटक-तथास्तू), द्वितीय पारितोषिक चंद्रशेखर मुळये (नाटक-वॅट नाईट), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक-एक्सपायरी डेट), द्वितीय पारितोषिक साईप्रसाद शिर्सेकर (नाटक- तथास्तू), नेपथ्य प्रथम पारितोषिक प्रशांत साखळकर (नाटक-देंट नाईट), द्वितीय पारितोषिक रॉबीन लोपीस (नाटक-कृष्णकिनारा), 

रंगभूषा प्रथम पारितोषिक उल्हेश खंदारे (नाटक-कोमल गांधार), द्वितीय पारितोषिक हेमंत वर्दम (नाटक-सावरबेट) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक गोपाळ जोशी (नाटक- तथास्तू) व शुभदा टिकम (नाटक-एक्सपायरी डेट), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे रक्षिता पालव (नाटक- वाटेला सोबत हवी), अंकिता कुलकर्णी (नाटक- त्या तिघांची गोष्ट), मुक्ता शेंबेकर (नाटक-देंट नाईट), सोनल शेवडे (नाटक-तथास्तू), कांचन खानोलकर (नाटक- कृष्णकिनारा), शुभम कुशे (नाटक- परिघ), विवेक गोखले (नाटक- लॉलीपॉप), प्रदीप होडावडेकर (नाटक-कालचन्द्र), दीपक माणगांवकर (नाटक- वॅट नाईट), शरद सावंत (नाटक- कृष्णकिनारा)

चिपळूण, मालवण व, वेंगुर्ला येथे  झालेल्या स्पर्धेत एकूण २१ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले, स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नरेंद्र आमले, सुधीर सेवेकर, प्रतिभा नागपूरे यांनी काम पाहिले.

Web Title: 62nd Maharashtra State Amateur Marathi Drama Competition Tathastu from Ratnagiri Center stands first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.