चिपळूण झालं चकाचक, स्वच्छता मोहिमेत गोळा केले ६४० किलो प्लास्टिक 

By संदीप बांद्रे | Published: June 27, 2023 06:57 PM2023-06-27T18:57:45+5:302023-06-27T18:59:01+5:30

चिपळूण : ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत चिपळूण नगरपरिषद व चिपळूण बचाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज, मंगळवारी (दि.२७ ...

640 kg of plastic collected in Chiplun during cleanliness drive | चिपळूण झालं चकाचक, स्वच्छता मोहिमेत गोळा केले ६४० किलो प्लास्टिक 

चिपळूण झालं चकाचक, स्वच्छता मोहिमेत गोळा केले ६४० किलो प्लास्टिक 

googlenewsNext

चिपळूण : ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत चिपळूण नगरपरिषद व चिपळूण बचाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज, मंगळवारी (दि.२७ ) सकाळी शहरातील नाले, परे, सार्वजनिक जागा व शिवनदी, वाशिष्ठी नदी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यानिमित्त प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवून ६४० किलो प्लास्टिक गोळा केले.

चिपळूण शहर प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. यामध्ये शहरातील सामाजिक संस्थांसह नागरिक व विविध शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. प्रांताधिकारी आकाश लिंगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केलेल्या आवाहनानुसार हे अभियान शहरात विविध ८ ठिकाणी राबविण्यात आले.

दर आठवड्याला नगर परिषदेने गटारांची सफाई केल्यानंतर टनावारी प्लास्टिकच्या बाटल्या आढळत आहेत. गंभीर बनत चाललेली प्लास्टिक कचऱ्याची समस्या नागरिकांच्या मदतीने व जनजागृती अभियानातून कमी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या स्वच्छता अभियानात नगर परिषद अधिकारी व कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा, महाविद्यालय, विविध संस्था, संघटनांनी सहभाग घेतला हाेता.

Web Title: 640 kg of plastic collected in Chiplun during cleanliness drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.