रत्नागिरीत कोरोनाचे ६६ नवे रुग्ण, ३ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:38 AM2021-09-09T04:38:37+5:302021-09-09T04:38:37+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे ६६ रुग्ण आढळले आहेत. तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, २३ रुग्ण कोरोनातून ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे ६६ रुग्ण आढळले आहेत. तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, २३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात १,३१४ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४,२७३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील आरटीपीसीआर चाचणीत ३१ रुग्ण तर अँटिजन चाचणीत ३५ बाधित रुग्ण सापडले. त्यात मंडणगड तालुक्यात ५ रुग्ण, दापोली, गुहागर, खेडमध्ये प्रत्येकी ७ रुग्ण, चिपळुणात १६, रत्नागिरीत १६, लांजात २ आणि संगमेश्वर, राजापुरात प्रत्येकी ३ रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात खेड तालुक्यात २ तर रत्नागिरीत एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्युदर ३.८ टक्के आहे. मागील आठवड्यात बाधितांचा मृत्युदर २.९५ टक्के होता. आजपर्यंत एकूण २,३६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण ७६,६७३ रुग्ण आढळले आहेत. त्यातील एकूण ७२,९९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९५.२० टक्के आहे.