६९ हजार ग्राहकांनी थकविले १२ कोटी

By Admin | Published: August 15, 2016 12:23 AM2016-08-15T00:23:19+5:302016-08-15T00:23:19+5:30

कांचन आजनाळकर : महावितरणचे पथक पुन्हा सक्रिय होणार

69 thousand customers are exhausted 12 crores | ६९ हजार ग्राहकांनी थकविले १२ कोटी

६९ हजार ग्राहकांनी थकविले १२ कोटी

googlenewsNext

रत्नागिरी : जिल्ह््यातील ६९ हजार १८८ ग्राहकांनी १२ कोटी ४३ लाख ६३ हजार रूपयांची वीजबिले न भरल्यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे. मार्च अखेर केवळ लाखात असलेली थकबाकी आता कोट्यवधीत पोहोचली आहे. या थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे पथक पुन्हा सक्रीय होणार असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता कांचन आजनाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महावितरण कंपनीकडे अनेक ग्राहकांची थकबाकी आहे. यासाठी आता महावितरण कंपनी कडक पावले उचलणार असल्याचे आजनाळकर म्हणाले. चिपळूण विभागात १९ हजार ४३५ ग्राहकांकडे ३ कोटी ५४ लाख ३ हजारांची थकबाकी आहे. खेड विभागातील १८ हजार ९९१ ग्राहकांकडे ३ कोटी ७४ लाख ४० हजार तर रत्नागिरी विभागातील ३० हजार ७६२ ग्राहकांकडे ५ कोटी १५ लाख २० हजार रूपयांची थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात तर सर्वात कमी थकबाकी खेड विभागात आहे.
जिल्ह््यातील एकूण ५४ हजार ४२६ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ६० लाख ८९ हजार, वाणिज्य विभागातील ७ हजार ९२६ ग्राहकांकडे २ कोटी ७९ लाख ३ हजार, १३८६ औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी २२ लाख ७८ हजार रूपयांची थकबाकी आहे. ३ हजार १३८ कृषीपंपाच्या ग्राहकांकडे २० लाख ८२ हजार, ५१५ सार्वजनिक पथदीपांची ५६ लाख १ हजार तर अन्य ९६३ ग्राहकांकडे ३० लाख ९४ हजारांची थकबाकी आहे.
चिपळूण विभागातील १५ हजार २५४ ग्राहकांकडे १ कोटी ९६ लाख रूपये थकबाकी आहे. २१४५ वाणिज्यिक ग्राहकांकडे ८१ लाख ४२ हजार तर औद्योगिकच्या ३४५ ग्राहकांकडे ३५ लाख ५७ हजार, कृषीच्या १२४३ ग्राहकांकडे ७ लाख १ हजार, २०९ सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे २२ लाख ८८ हजार, ५१ सार्वजनिक पथदीपांचे ३ लाख ७ हजार तर १८८ अन्य ग्राहकांकडे ७ लाख १५ हजाराची थकबाकी आहे. एकूण १९ हजार ४३५ ग्राहकांकडे ३ कोटी ५४ लाख ३ हजारांची थकबाकी आहे.
खेड विभागातील १५ हजार ४४ ग्राहकांकडे १ कोटी ७५ लाख ४९ हजार, २०९५ वाणिज्यिक ग्राहकांकडे ७२ लाख ३३ हजार, ३६९ औद्योगिक ग्राहकांकडे ४६ लाख १ हजार, कृषीपंपाच्या ६१८ ग्राहकांकडे ५ लाख ९८ हजार, २१९ सार्वजनिक पथदीपांचे १९ लाख १ हजार, ३४७ सार्वजनिक पथदीपांचे ४५ लाख ६४ हजार तर इतर २९९ ग्राहकांकडे ९ लाख ९३ हजारांची थकबाकी आहे. एकूण १८ हजार ९९१ ग्राहकांकडे ३ कोटी ७४ लाख ४० हजार रूपयांची थकबाकी आहे.
रत्नागिरी विभागातील २४ हजार १२८ ग्राहकांकडे २ कोटी ८८ लाख ४७ हजार, ३६८६ वाणिज्यिक ग्राहकांकडे १ कोटी २५ लाख २९ हजार, ६७२ औद्योगिक ग्राहकांकडे ४१ लाख १९ हजार, कृषीपंपाच्या १ हजार २७७ ग्राहकांकडे ७ लाख ८३ हजार, ४०६ सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे ३१ लाख २५ हजार, ११७ सार्वजनिक पथदीपांचे ७ लाख ३१ हजार तर इतर ४७६ ग्राहकांकडे १३ लाख ८६ हजार मिळून एकूण ३० हजार ७६२ ग्राहकांकडे ५ कोटी १५ लाख २० हजार रूपयांची थकबाकी आहे.
रत्नागिरी जिल्ह््यातील अनेकजण हे मुंबई तसेच अन्य शहरात नोकरी व्यवसायासाठी स्थायिक आहेत. गणेशोत्सवासाठी ही मंडळी आवर्जून गावी परततात. या कालावधीत महावितरणने थकबाकी वसुलीसाठी पथक तयार केले आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित करण्यात येणार आहे. महावितरणला सहकार्य करणाऱ्या ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी संधी दिली जाणार असल्याचे आजनाळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 69 thousand customers are exhausted 12 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.