रत्नागिरी शहरातील महाविद्यालयाचे ७ शिक्षक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 07:12 PM2021-02-22T19:12:47+5:302021-02-22T19:15:50+5:30

corona virus Ratnagirinews- रत्नागिरी शहरातील एका महाविद्यालयातील ७ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात आणखी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाने आणखी दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९८५६ इतकी झाली असून, मृतांचा आकडा ३६२वर पोहोचला आहे.

7 teachers of Ratnagiri college positive | रत्नागिरी शहरातील महाविद्यालयाचे ७ शिक्षक पॉझिटिव्ह

रत्नागिरी शहरातील महाविद्यालयाचे ७ शिक्षक पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देरत्नागिरी शहरातील महाविद्यालयाचे ७ शिक्षक पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेय, निष्काळजीपणाचा फटका

रत्नागिरी : शहरातील एका महाविद्यालयातील ७ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात आणखी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाने आणखी दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९८५६ इतकी झाली असून, मृतांचा आकडा ३६२वर पोहोचला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी शहरातील एका महाविद्यालयाचे शिक्षक हजर होण्यासाठी महाविद्यालयात गेले होते. हजर होण्यापूर्वी त्यांची चाचणी केली असता ७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हे शिक्षक कोठून आले होते, याचा शोध घेतला जाणार आहे. जिल्ह्यात २३४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २०७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असतानाच पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीमध्ये २१ रुग्ण आणि ॲन्टिजेनमध्ये ६ रुग्ण आढळले.

संगमेश्वर तालुक्यातील ५२ वर्षीय आणि दापोलीतील ७५ वर्षे वयाच्या अशा दोन महिला रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. दिवसभरात ७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत एकूण ९३१५ रुग्ण बरे झाले आहेत.

रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यात १५ रुग्ण, खेडमधील ६, चिपळुणातील ३, संगमेश्वरातील २ आणि लांजातील एका रुग्णाचा समावेश आहे. ३३ कोरोनाचे रुग्ण गृह अलगीकरणात असून १३२ रुग्ण जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. कोरोनाची रुग्ण संख्या कमी होताच कोरोना गेल्याचा समज करून नागरिक बेफिकीरपणे वागू लागले आहेत. नियमांचे पालन केले जात नसल्याने चिंता वाढली आहे.

रुग्ण फिरला लग्नात

जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या व्यक्तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाला आणण्यासाठी आरोग्य पथक घरी गेले असता ती व्यक्ती गावातील एका लग्न समारंभात फिरल्याची माहिती मिळाली. त्याच्याशी अनेकवेळा संपर्क करूनही त्याने फोन उचलला नाही. अखेर तेथील सरपंच, पोलीस पाटील यांना संपर्क करण्यात आला. त्यानंतर त्या पॉझिटिव्ह व्यक्तिला लग्न मंडपातून बाहेर काढण्यात आले.

Web Title: 7 teachers of Ratnagiri college positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.