लांजात पुन्हा विस्फोट ७० कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:31+5:302021-06-11T04:22:31+5:30
लांजा : दोन दिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला असताना गुरुवारी पुन्हा रुग्णांमध्ये मोठी ...
लांजा
: दोन दिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला असताना गुरुवारी पुन्हा रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका दिवसामध्ये तालुक्यात ७० कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये ४ जणांचे बळीही गेले आहेत.
मंगळवार व बुधवारी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली हाेती. मात्र, गुरुवारी करण्यात आलेल्या अँटिजन चाचणीत १० तर आरटीपसीआर चाचणीत ५७ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. शहरामध्ये फिरणाऱ्या ४ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये १ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. बुधवारी २३ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यात दोघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
तालुक्यात गुरुवारी सर्वाधिक सालपे घागवाडी येथे २४ तर इंदवटी बाईंतवाडी येथे १९ रुग्ण, खावडी कोतवडेकरवाडीत ६, गोळवशी कुंभारवाडीत २, लांजा आगरवाडीत ३, खेरवसे बौध्दवाडी, निओशी, लांजा कुरुपवाडी, कुंभारवाडी, उपळे बौद्धवाडी, शिरवली जानस्करवाडी, व्हेळ सडेवाडी येथे प्रत्येकी १, कोंड्ये बौद्धवाडीत २ तर भांबेडला ४ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील कोरोना बळीची संख्या १०३ झाली असून, एकूण रुग्णसंख्या २,५७१ झाली आहे. सध्या ४४६ सक्रिय रुग्ण असून, आतापर्यंत २,०२२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.