लॉकडाऊन काळात ७२ हजार दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:41 AM2021-06-16T04:41:08+5:302021-06-16T04:41:08+5:30
रत्नागिरी : कडक लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या कार्यक्षेत्रातील ५ पोलीस स्थानकात धडक मोहीम राबवण्यात ...
रत्नागिरी : कडक लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या कार्यक्षेत्रातील ५ पोलीस स्थानकात धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत नियमभंग करणाऱ्यांकडून ७२,६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या कार्यक्षेत्रात रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण, पूर्णगड, जयगड व संगमेश्वर अशी पाच पोलीस स्थानके येतात. या पोलीस स्थानकांतर्गत कडक लॉकडाऊनच्या काळात अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या काळात विनाकारण फिरणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात आली. पाच पोलीस स्थानकांतर्गत १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच विनामास्क फिरणाऱ्या ९५ जणांकडून ४६,६०० रुपयांचा दंड घेण्यात आला आहे. आस्थापनेच्या २६ प्रकरणांमधून २६ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. मोटार वाहन कायदा अंतर्गत ४६५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आता अनेक व्यवहार अनलॉक झाले असले, तरी लोकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे कायम ठेवावे, असे आवाहन वाघमारे यांनी केले आहे.