Crime News राज्यात आतापर्यंत ९२ हजार गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 05:59 PM2020-05-04T17:59:48+5:302020-05-04T18:02:42+5:30
लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८३ हजार २९९ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा ६३३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात दि. २२ मार्च ते ३ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९२ हजार १६१ गुन्हे दाखल झाले आहेत. तर १८ हजार २१६ व्यक्तींना अटक करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात आत्तापर्यंत ७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
ही माहिती मुंबईतील पोलीस विभागातर्फे प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. आत्तापर्यंत राज्यात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद पुणे शहरात झाली असून, १४ हजार ७५२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक कमी सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद अकोल्यामध्ये असून, त्याची संख्या ७२ आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.
लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८३ हजार २९९ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा ६३३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार २५५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ५१ हजार ८७४ वाहने जप्त करण्यात आली आहेत. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १७५ घटनांची नोंद झाली असून, यात ६५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.