राजापुरात आढळले नवे ७७ काेराेना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:31+5:302021-06-02T04:24:31+5:30
राजापूर : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून, सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्यात ७७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ...
राजापूर : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून, सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्यात ७७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २,३९१ वर पोहचला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांनी दिली आहे. तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने रायपाटण व धारतळे कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची गर्दी झाली आहे.
सोमवारी नव्याने आढळलेल्या ७७ रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा हा २,३९१ वर पोहाेचला आहे. यापैकी सध्या ६६१ रुग्ण अॅक्टिव्ह असून, आजपर्यंत १,६२६ जण उपचारांती बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने तालुक्यात १०४ जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या अॅक्टिव्ह ६६१ रुग्णांपैकी रायपाटण कोविड केअर सेंंटरमध्ये १०२, धारतळेमध्ये २३, जिल्हा शासकीय रुग्णालयात ४३, गृह अलगीकरणामध्ये ४२२, खासगी रुग्णालयांमध्ये १४, तालुक्याबाहेर ३३ तर संस्थात्मक २१ रुग्ण उपचार घेत असल्याचे डॉ. परांजपे यांनी सांगितले.