जिल्ह्यात ८ उपकेंद्र बंद

By admin | Published: November 23, 2014 10:07 PM2014-11-23T22:07:02+5:302014-11-23T23:44:05+5:30

महावितरणचा आडमुठेपणा : वीजपुरवठा नसल्याने ठप्प

8 sub-stations closed in the district | जिल्ह्यात ८ उपकेंद्र बंद

जिल्ह्यात ८ उपकेंद्र बंद

Next

रहिम दलाल - रत्नागिरी  -लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेली ग्रामीण भागातील ८ उपकेंद्र वर्ष उलटले तरी वीजपुरवठा करण्यात आलेला नसल्याने ती बंद आहेत़ महावितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यात यावी, यासाठी उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली़ मात्र, या उपकेंद्रांमधून गरजू, गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देता येत नसेल तर लाखो रुपये खर्चून बांधलेल्या इमारतींचा उपयोग काय, असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे़
रुग्णांना शासनाकडून मोफत आरोग्य सेवा देण्यात यावी, यासाठी जीवनदायी योजना सुरु करण्यात आली़ त्याचा हजारो रुग्णांनी फायदा करुन घेतला आहे़ तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांनातर्गतही शासनाने रुग्णांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा दिली जात आहे़ शासन दरवर्षी गरजू व गरिबांसाठीच्या आरोग्यसेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे़ मात्र, त्यासाठी लागणाऱ्या विजेसारख्या महत्त्वाच्या बाबीचा पुरवठा करण्यास महावितरणकडून चालढकल केली जात केली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, ३६८ उपकेंद्र आहेत़ याद्वारे जिल्ह्यातील हजारो रुग्णांना दररोज उपचार दिले जात आहेत़ रुग्णांना चांगली सेवा देण्यात यावी, यासाठी उपकेंद्रही सुस्थितीत असणे आवश्यक आहेत़ त्यासाठी जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करुन ८ उपकेंद्रांच्या नवीन इमारतींचे बांधकाम केले़
या उपकेंद्रांच्या इमारती पूर्ण होऊन सुमारे दीड वर्ष उलटले तरी त्यांना वीज व पाणी पुरवठा देण्यात आलेला नाही़ महावितरणकडे विद्युत पुरवठ्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्रस्ताव दाखल केला आहे़ मात्र, महावितरणकडून वर्ष उलटले तरी त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याने अद्याप वीजजोडणी केलेली नाही़ त्यामुळे ही उपकेंद्र वीज आणि पाणी पुरवठा नसल्याने आजही बंद आहेत़ त्यामुळे महावितरण कंपनी वीज जोडणी आणि ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठा कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़
विशेष म्हणजे या उपकेंद्राबाबत आरोग्य विभागाकडून महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र या आठपैकी एकाही उपकेंद्राला वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. वीजजोडणीच नसल्याने नव्याने बांधलेल्या या इमारतीत यंत्रणाही बसवलेली नाही. त्यामुळे नवीन असूनही इमारती ओस पडल्या आहेत. जनतेच्या आरोग्याबाबत महावितरणला किती कळवळा आहे, हेच यावरून दिसून येते.


नवीन उपकेंद्र खालीलप्रमाणे आहेत़
तालुकाबंद उपकेंद्र
संगमेश्वर बोंड्ये, कुचांबे
चिपळूणकुंभार्ली
खेडसवणस, गुणदे
लांजाव्हेळ
राजापूरहसोळ, भू


उपकेंद्रांना पाणी पुरवठ्याची अवश्यकता
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लाखो रुपये खर्च करुन आठ उपकेंद्रांच्या नवीन इमारतींचे बांधकाम केले़ ही उपकेंद्रे सुरु करण्यासाठी वीज पुरवठ्यासह पाणी पुरवठ्याची सोय असणे आवश्यक आहे़ मात्र, वीजपुरवठा तर नाहीच, शिवाय ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठाही करण्यात आलेला नाही़ त्या उपकेंद्रांच्या नवीन इमारती केवळ शोभेच्या वास्तू बनल्या आहेत़ मुलभूत गरजांची व्यवस्था कधी होणार? असा सवाल होत आहे.

Web Title: 8 sub-stations closed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.