जिल्ह्यात कोरोनाचे ९० नवे रुग्ण सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:35 AM2021-09-23T04:35:56+5:302021-09-23T04:35:56+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९० रुग्ण सापडले आहेत, कोरोनामुक्त झालेल्या ५३ रुग्णांना घरी साेडण्यात आले आहे. ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९० रुग्ण सापडले आहेत, कोरोनामुक्त झालेल्या ५३ रुग्णांना घरी साेडण्यात आले आहे. पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हाभरात ६३० रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात ८३९ आरटीपीसीआर चाचण्या तर २,४९९ अँटिजन चाचण्या करण्यात आली. त्यामध्ये मंडणगड, गुहागर, लांजा व राजापूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले. दापोलीत १७, खेडात ४, चिपळुणात २२, संगमेश्वरात ११ तर रत्नागिरीत २८ रुग्ण सापडले आहेत. त्यात आरटीपीसीआर चाचणीतील ५० रुग्णांचा आणि अँटिजन चाचणीतील ४० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७७,४४७ रुग्ण झाले आहेत.
जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड या तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा तर रत्नागिरीतील २ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधित मृतांची संख्या २,४०१ झाली आहे. बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ३.१० टक्के आहे. एकूण ७४,४१६ बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांचे बरे हाेण्याचे प्रमाण ९६.९ टक्के आहे.