९० टक्के शाळांना क्रीडांगणे नाहीत

By admin | Published: May 29, 2016 11:19 PM2016-05-29T23:19:20+5:302016-05-30T00:44:10+5:30

एक लाखाचे अनुदान : खेळाडू निर्मितीत मोठी अडचण

90 percent of the schools do not have playgrounds | ९० टक्के शाळांना क्रीडांगणे नाहीत

९० टक्के शाळांना क्रीडांगणे नाहीत

Next

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या २४९८ प्राथमिक शाळांना क्रीडांगणे नाहीत. तब्बल ९० टक्के शाळांमध्ये क्रीडांगणे नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये खेळाडू निर्माण होण्यास ही मोठी अडचण ठरत आहे. तरीही शिक्षकवर्गाकडून खेळाडू निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण २७८६ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये प्राथमिक (इयत्ता १ ते ४) १६७८, उच्च माध्यमिक (इयत्ता १ ते ७ ते ४ ते ७) १०९९ व माध्यमिक व उच्च माध्यमिक ९ शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गतवर्षी शैक्षणिक माहिती प्रणालीवर आधारित संक्षिप्त सांख्यिकीय माहितीचा अहवाल शासनाला सादर केला होता.
या अहवालानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक शाळांची माहिती एकत्रित करुन ती शासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळा पायाभूत भौतिक सुविधांपासून अजूनही वंचित आहेत. त्यामध्ये अपंगांसाठीचे रॅम्प, स्वयंपाकगृह, संरक्षक भिंत, क्रीडांगण तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी किमान एक वर्गखोली असणेही आवश्यक आहे.
पूर्वी क्रीडांगणाचा विचार न करता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या हेतूने ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा उभारण्यात आल्या होते. त्यासाठी अनेकांनी आपल्या जमिनी शासनाला दिल्या. त्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये शाळा दिसत आहेत. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेजारील शेतांच्या मळ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. (शहर वार्ताहर)

अनुदानाचा काय उपयोग : केवळ क्रीडा साहित्यावरच खर्च
विविध खेळांमध्ये खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी शासनाच्या क्रीडा विभागाकडून क्रीडांगण विकासासाठी १ लाख रुपयांचे अनुदान प्रत्येक शाळेला दिले जाते. त्यामधून क्रीडा साहित्य, ग्राऊंड निर्मितीसाठी खर्च करण्यात येतो. मात्र, शाळांना क्रीडांगणेच नसल्याने खेळाडू कसे निर्माण होणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.
जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू आहेत. शेतमळ्यांमध्ये क्रीडांगणे तयार करून ही मुले सराव करत आहेत. हा सराव करताना त्यांना अनेकवेळा जखमा होत आहेत. त्यामुळे त्यांना खेळातील नैपुण्य दाखविण्यासही वाव मिळत नाही. एकीकडे शासन शालेय जीवनातूनच खेळाडू तयार व्हावेत, यासाठी विविध स्पर्धा घेत असताना शाळांना मैदानेच उपलब्ध नसल्याने खेळाडू तयार कसे होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: 90 percent of the schools do not have playgrounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.