रत्नागिरीत ९२ कोटींचे प्रशासकीय भवन; शासनाकडून मान्यता: पालकमंत्री उदय सामंत
By मनोज मुळ्ये | Published: January 26, 2024 01:36 PM2024-01-26T13:36:50+5:302024-01-26T13:38:14+5:30
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : राज्यातील प्रथम क्रमांकाचे ९२ कोटी खर्चाचे प्रशासकीय भवन रत्नागिरीमध्ये उभारले जाणार आहे. राज्य शासनाची त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 'रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान', हे स्लोगन घेऊन रत्नागिरीकर आणि प्रशासन जोरदार काम करत आहे, असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डाॕ गणेश मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वप्रथम उपस्थितीत स्वांतत्र्य सैनिक त्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी - कर्मचारी, पत्रकार आणि जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ५०० वर्षापासून असलेली मागणी आणि भारतीयांची अस्मिता असणारे प्रभू रामचंद्राचे मंदिर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. त्यासाठी जिल्हावासियांच्यावतीने प्रधानमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा विकासात्मक घोडदौड करतोय.
यावेळी त्यांनी पाणी योजना, सिंधुरत्न योजना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा इस्रो, नासा पाहणी दौरा, नियोजन मंडळाचा आराखडा, पोलि वसाहत, प्राणी संग्रहालय, देशातला पहिला थ्रीडी मल्टीमीडिया शो, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा, रत्नागिरीतील विमानतळ, काजू बोर्ड अशा अनेक कामांचा आवर्जून उल्लेख केला.