रत्नागिरी जिल्ह्यात ९४ कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:32 AM2021-03-31T04:32:29+5:302021-03-31T04:32:29+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली असून २४ तासांत आणखी ९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली असून २४ तासांत आणखी ९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०,९४२ झाली आहे. ६० जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत १० हजार ७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात एकाचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधित मृतांची संख्या ३७६ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगली जात आहे. मात्र, राजकीय मंडळी आणि लोकांकडून कोरोना नियम पाळले जात नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. ५४९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४५५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. जिल्ह्यात पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीतील ७७ रुग्ण तर अँटीजन तपासणीतील १७ रुग्ण आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ३५ रुग्ण, गुहागरमधील ५, चिपळुणातील ३२, संगमेश्वरमधील १३, मंडणगडमध्ये १, लांजात २ आणि दापोली, खेडमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात २३५ कोरोना रुग्ण असून ४०२ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
चिपळूण तालुक्यातील एका ६७ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३७६ झाली आहे. मृतांचे प्रमाण ३.४३ झाले असून बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण ९२.७ टक्के आहे.
चौकट-
रत्नागिरी तालुक्यामध्ये महिला रुग्णालयात १५ रुग्ण, जिल्हा शासकीय रुग्णालयात २, कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्र २, जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्र २, मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात ७, हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्र १, ॲपेक्स हॉस्पिटल, परकार हॉस्पिटल येथे प्रत्येकी १ रुग्ण असे एकूण ३५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून, आरोग्य यंत्रणेकडून लोकांना काेविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.