वारस नाेंदीसाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याविराेधात गुन्हा दाखल
By अरुण आडिवरेकर | Published: August 28, 2023 10:49 PM2023-08-28T22:49:27+5:302023-08-28T22:57:38+5:30
तक्रारदार यांच्या वडिलांचा २०१४ साली मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे जमीन मिळकतीचा वारस तपास हाेऊन तक्रारदाराचे नावे करण्यासाठी अर्ज केला हाेता.
रत्नागिरी : वडिलांच्या मृत्यूपश्चात जमिनीच्या मिळकतीवर वारस म्हणून नाेंद करण्यासाठी ५०० रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिवतर (ता. खेड) येथील तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमाेल महावीर पाटील (३१, सध्या रा. खेड, मूळ रा. इंग्राेळे काॅर्नर हुपरी, ता. हातकणंगले, काेल्हापूर) असे तलाठ्याचे नाव आहे. ताे सजा शिवतर येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांचा २०१४ साली मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे जमीन मिळकतीचा वारस तपास हाेऊन तक्रारदाराचे नावे करण्यासाठी अर्ज केला हाेता. त्यासाठी अमाेल पाटील याने १७ फेब्रुवारी २०२३ राेजी १००० रुपयांची मागणी केली हाेती. याबाबत पडताळणी केल्यानंतर ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी रत्नागिरी लाचलुचपत विभागाने त्याच्यावर खेड पाेलिस स्थानकात २८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.