महामार्गावर आंबेड बुद्रुक येथे डंपरने घेतला पेट, आग आटोक्यात आणण्यात यश
By अरुण आडिवरेकर | Published: May 22, 2023 12:32 PM2023-05-22T12:32:42+5:302023-05-22T12:33:30+5:30
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली.
देवरुख : मुंबई - गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे जेएम म्हात्रे कंपनीच्या डंपरने पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली.
निझाम अन्सारी हा रिकामा डंपर घेऊन वांद्री येथे जात होता. मात्र, आंबेड बुद्रुक येथे आला असता डंपरने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक अर्धा तास थांबवण्यात आली होती. त्यानंतर पाण्याचा बंब मागविण्यात आला.
महामार्गावर काम करणारे डंपर मिलर आणि टँकरने आग विझवण्यात आली. तसेच रस्त्यावरील वाहतूक एका बाजूने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. संगमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.