रत्नागिरीत लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार, पालकमंत्र्यांनी पाहणीवेळी घेतला कामांचा आढावा

By शोभना कांबळे | Published: April 21, 2023 03:03 PM2023-04-21T15:03:17+5:302023-04-21T15:03:52+5:30

नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार असलेल्या पोंमेडी, पावस आणि मजगाव येथीलही कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

A government medical college will soon be established in Ratnagiri, the guardian minister reviewed the works during the inspection | रत्नागिरीत लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार, पालकमंत्र्यांनी पाहणीवेळी घेतला कामांचा आढावा

रत्नागिरीत लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार, पालकमंत्र्यांनी पाहणीवेळी घेतला कामांचा आढावा

googlenewsNext

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरूवार, दि. २० रोजी रत्नागिरी शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हा महिला रुग्णालय येथे रत्नागिरी वैद्यकीयमहाविद्यालयासंदर्भातील कामाचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महाविद्यालय रंगरंगोटी, मुलांचे वसतीगृह, पदभरती, मुलांचे प्रवेश आदि विषयांवर मंत्री सामंत यांनी संबधितांसोबत चर्चा केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसंदर्भात आढावा घेताना वैद्यकीय महाविद्यालय सुरु होत असल्याने आवश्यक त्या सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा. आणि सर्व कामे लवकर लवकर पूर्ण करा, अशा सुचना त्यांनी दिल्या.

पालकमंत्री उदय सामंत यांनी ‍ खांदाटपाली, ता. चिपळूण, ऊक्षी, ता. संगमेश्वर, चांदेराई, ता. रत्नागिरी, मिरजोळे, ता. रत्नागिरी, अर्जुना गोडी, ता. राजापूर येथे गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार असलेल्या पोंमेडी, पावस आणि मजगाव येथीलही त्यांनी यावेळी आढावा घेतला. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना त्यांनी संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

यावेळी रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यंवशी, कार्यकारी अभियंता काझी, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी, चिपळूणचे प्रांतधिकारी प्रवीण पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये आदि संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: A government medical college will soon be established in Ratnagiri, the guardian minister reviewed the works during the inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.