रत्नागिरीतील माहेर संस्थेने उभारली पुस्तकांची गुढी

By शोभना कांबळे | Published: March 22, 2023 04:05 PM2023-03-22T16:05:08+5:302023-03-22T16:06:24+5:30

पुस्तकाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम

A library of books set up by Maher Sanstha in Ratnagiri | रत्नागिरीतील माहेर संस्थेने उभारली पुस्तकांची गुढी

रत्नागिरीतील माहेर संस्थेने उभारली पुस्तकांची गुढी

googlenewsNext

रत्नागिरी : गुढीपाडव्यानिमित्त नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून येथील माहेर संस्थेत पुस्तकांची गुढी उभारून समाजाला वेगळा संदेश दिला.

रत्नागिरी येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये वर्षातील सर्व सण- उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडतात. यावर्षी गुढीपाडवा हा सणदेखील उत्साहाने पार पडला. या गुढीपाडव्यानिमित्त नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून माहेर संस्थेत पुस्तकांची गुढी उभारण्यात आली. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे, ते ज्या पुस्तकातून मिळते त्या पुस्तकांना वाचणे, माहिती करून घेणे हे फार गरजेचे आहे. त्या निमित्ताने पुस्तकांचा सन्मान व्हावा. यासाठी मराठी नवीन वर्षाच्या दिनानिमित्त पुस्तकरूपी गुढी उभारण्यात आली.

संस्थेतील प्रवेशितांना पुस्तकाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला.

Web Title: A library of books set up by Maher Sanstha in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.