चिपळुणातील राजकीय पदाधिकाऱ्याचा महिलेला १३ लाखांना गंडा, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 07:07 PM2024-10-28T19:07:52+5:302024-10-28T19:08:18+5:30

व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष

A political office holder in Chiplun cheated a woman of 13 lakhs Filed a case | चिपळुणातील राजकीय पदाधिकाऱ्याचा महिलेला १३ लाखांना गंडा, गुन्हा दाखल

चिपळुणातील राजकीय पदाधिकाऱ्याचा महिलेला १३ लाखांना गंडा, गुन्हा दाखल

चिपळूण : एका राजकीय पक्षाच्या जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदी कार्यरत असलेल्या व्यक्तीने चिपळुणातील महिलेची तब्बल १३ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शनिवारी येथील पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चार वर्षांपूर्वी व्यवसायाच्या नावाखाली ही रक्कम घेतली होती.

रईस महमूद अलवी (४८, रा. गोवळकोट चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. रईस अलवी हा एका राजकीय पक्षाच्या जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदी कार्यरत आहे, तसेच संबंधित महिला ही शहरातील खेंड विभागातील रहिवासी असून, रईस अलवी याला १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत टप्प्याटप्प्याने १३ लाख १९ हजार रुपये दिले होते. 

भाजीपाला- कांदा-आयात निर्यातीमध्ये व्यवसाय करण्यासाठी ही गुंतवणूक करत असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच त्या मोबदल्यात दुप्पट रक्कम मिळेल, असे आमिषही दाखवले होते. त्यासाठी टप्प्याटप्प्याने रक्कम घेतली. मात्र, ठरावीक कालावधीनंतर ही महिला पैसे परत मागण्यासाठी गेल्या असता उडवाडवीची उत्तरे देऊन महिलेची आर्थिक फसवणूक केली. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A political office holder in Chiplun cheated a woman of 13 lakhs Filed a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.