धक्कादायक! भरदिवसा आजोबांसमोरच सहा वर्षाच्या नातीला पळविले, आडिवरेत भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 05:07 PM2023-04-22T17:07:46+5:302023-04-22T17:08:02+5:30

शाळेच्या व्हरांड्यात घडली घटना

A six-year-old grandson was abducted in front of his grandfather in broad daylight in Adivare Ratnagiri | धक्कादायक! भरदिवसा आजोबांसमोरच सहा वर्षाच्या नातीला पळविले, आडिवरेत भीतीचे वातावरण

धक्कादायक! भरदिवसा आजोबांसमोरच सहा वर्षाच्या नातीला पळविले, आडिवरेत भीतीचे वातावरण

googlenewsNext

राजापूर :तालुक्यातील आडिवरे येथील शाळा नं. १ मधील वर्गातून एका सहा वर्षीय मुलीला पळवून नेल्याचा प्रकार २० एप्रिल राेजी सकाळी ८:४५ वाजेच्या दरम्यान घडला. याबाबत नाटे पाेलिस स्थानकात तिच्या आजाेबांनी तक्रार दिली आहे. मात्र, या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शुक्रवारी (२१ एप्रिल) पालकांनी मुलांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे शाळेत शुकशुकाट पसरला हाेता.

याबाबत मुलीच्या आजाेबांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची नात आडिवरे शाळा नं. १ या मराठी शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे. ते आपल्या नातीला शाळेत साेडण्यासाठी व नेण्यासाठी स्वत: येतात. शाळा सुटेपर्यंत ते शाळेच्या व्हरांड्यात बसून राहतात. त्यांनी २० एप्रिल राेजी नातीला ७:३० वाजेच्या दरम्यान शाळेत साेडले. त्यानंतर ८:४५ वाजेच्या सुमारास त्याठिकाणी स्कार्प बांधून एक महिला आली. तिच्यासाेबत अन्य दाेन पुरुष हाेते. त्यांनी मुलीला उचलून घेतले. त्याचवेळी मुलगी रडायला लागल्याने शिक्षिकेने तिला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या महिलेने शिक्षिकेसह आजाेबांना ढकलून देऊन तिथून पळ काढला. या झटापटीत शाळेतील खुर्चीचीही माेडतोड झाल्याचे म्हटले आहे.

त्यानंतर ही महिला अन्य दाेन व्यक्तींसाेबत मुलीला घेऊन रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीत बसवून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नाटे पाेलिसांनी शाळेतील शिक्षिकेसह अन्य एका महिलेचा जबाब नाेंदवून घेतला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पाेलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: A six-year-old grandson was abducted in front of his grandfather in broad daylight in Adivare Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.