'शाळेला जायला उशीर झाला...परब साहेब एसटी सुरू करा', ST संपावर विद्यार्थ्याचं गाण्यातून आवाहन video
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 01:35 PM2022-04-04T13:35:16+5:302022-04-04T13:46:28+5:30
एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अद्याप ठाम
रत्नागिरी : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गाडी नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही. शाळेत वेळेवर जाता येत नसल्याने रत्नागिरीतील एका विद्यार्थ्याने चक्क गाणं तयार करून 'शाळेला जायला..उशीर झायला..एसटी सुरू करा ना, परब साहेब, एसटी सुरू करा' अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्याचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला असून, सगळीकडे या व्हिडिओची चर्चा आहे.
एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीवरुन एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करुन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. परिणामी एसटी सेवा अजूनही खोळंबली आहे. जिल्ह्यातील बससेवा विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातील काही आगारा मधून बस सेवा सुरू झाली असली तरी अजूनही बस फेऱ्यांचे प्रमाण कमी आहे.
बसफेऱ्या सुरू असल्याने सर्वाधिक हाल विद्यार्थ्यांचे होत आहेत सध्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना मिळेल ते वाहन पकडून शाळेत जावे लागत आहे. शाळेत वेळेवर जात नसल्याने रत्नागिरीतील एका विद्यार्थ्याने आपली व्यथा गाण्याच्या माध्यमातून मांडले आहेत. कामावर जायला.. उशीर झायला, बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला...या गाण्यावरुन या विद्यार्थ्यांने गाणं तयार करुन आपल्या व्यस्था मांडल्या आहेत. या गाण्यामध्ये विद्यार्थ्याने परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच लक्ष केले आहे. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून, सगळीकडे या व्हिडिओची चर्चा आहे.
VIDEO: 'शाळेला जायला उशीर झाला...परब साहेब एसटी सुरू करा', एसटी संपावर रत्नागिरीतील विद्यार्थ्याचं गाण्यातून आवाहन pic.twitter.com/4FVvTenTbL
— Lokmat (@lokmat) April 4, 2022