सहलीस गेलेला कोल्हापुरातील उचगावचा विद्यार्थी रत्नागिरीच्या समुद्रात बुडाला, स्थानिकांच्या मदतीमुळे वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:53 PM2022-11-17T12:53:25+5:302022-11-17T12:57:50+5:30

कोल्हापूर उचगाव येथील एका शाळेची सहल कोकणात आली होती.

A student from Uchgaon in Kolhapur who went on a trip drowned in the sea of ​​Ratnagiri | सहलीस गेलेला कोल्हापुरातील उचगावचा विद्यार्थी रत्नागिरीच्या समुद्रात बुडाला, स्थानिकांच्या मदतीमुळे वाचला जीव

सहलीस गेलेला कोल्हापुरातील उचगावचा विद्यार्थी रत्नागिरीच्या समुद्रात बुडाला, स्थानिकांच्या मदतीमुळे वाचला जीव

googlenewsNext

रत्नागिरी : कोल्हापूर उचगाव येथून सहलीसाठी रत्नागिरीत आलेल्या १०० मुलांच्या ग्रुपमधील १३ वर्षीय मुलगा रत्नागिरी शहरानजीकच्या आरे-वारे समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. आदित्य अरुण मंचावकर असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार करून कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.

कोल्हापूर उचगाव येथील एका शाळेची सहल कोकणात आली होती. ही सहल आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली होती. तेथून बुधवारी शिक्षक १०० मुलांना घेऊन रत्नागिरीत आले होते. रत्नागिरीत रत्नदुर्ग किल्ला पाहून गणपतीपुळेकडे निघाले होते. दुपारी एक वाजता सर्वजण आरे वारे समुद्रकिनारी पोहोचले. तेथे गेल्यानंतर मुले मौजमजा करण्यासाठी आरेवारे समुद्रात उतरली होती.

बराच वेळ मजा मस्ती सुरू असताना अचानक आदित्य अरुण मंचावकर हा मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात ओढला जाऊ लागला. त्यानंतर सोबत असलेल्या मुलांसह शिक्षकांनी आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यातील काही ग्रामस्थांनी समुद्रात जाऊन आदित्यला बाहेर काढले. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्य मूळचा कोल्हापूर येथे असल्याने रात्री उशिरा त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली

Web Title: A student from Uchgaon in Kolhapur who went on a trip drowned in the sea of ​​Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.