Ratnagiri news: कार-स्कूल बसला भीषण अपघात, कार उलटली; बसमधील १४ विद्यार्थी बालंबाल बचावले

By संदीप बांद्रे | Published: March 20, 2023 01:27 PM2023-03-20T13:27:00+5:302023-03-20T13:27:30+5:30

कारमधील बँकेचे काही अधिकारी किरकोळ जखमी

A terrible accident involving a car-school bus in front of Kapsal Digewadi bus station on the Mumbai Goa highway | Ratnagiri news: कार-स्कूल बसला भीषण अपघात, कार उलटली; बसमधील १४ विद्यार्थी बालंबाल बचावले

Ratnagiri news: कार-स्कूल बसला भीषण अपघात, कार उलटली; बसमधील १४ विद्यार्थी बालंबाल बचावले

googlenewsNext

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ डिगेवाडी बस स्थानकासमोर आज, सोमवारी सकाळी १०.३० वाजता कार व स्कूल बसला समोरासमोर भीषण अपघात घडला. या अपघातात स्कूल बसमधील १४ विद्यार्थी बालंबाल बचावले.

येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी रस्ता ठेवून काम केली जात आहेत. मात्र त्याबाबचे दिशादर्शक फलक उभारण्यात न आल्याने व काहीजण चुकीच्या दिशेने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. हाही अपघात यातूनच झाला. 

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा कार चालक संदीप सावंत हा रत्नागिरीहून खेडकडे निघाला होता. कामथे डिगेवाडी बस स्थानकासमोर स्कूलची बस अचानक विरुद्ध दिशेने आल्याने समोरासमोर धडक झाली. यात कार जागीच पलटी झाली. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तातडीने स्कूल बसमधील १४ विद्यार्थ्यांना गाडी बाहेर काढण्यात आले. ते सर्वजण सुखरूप होते. कारमधील बँकेचे काही अधिकारी किरकोळ जखमी झाले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा पोलिसांमार्फत सुरु आहे.

Web Title: A terrible accident involving a car-school bus in front of Kapsal Digewadi bus station on the Mumbai Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.