गणपतीपुळेत काेल्हापूरचा पर्यटक बुडता बुडता वाचला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 11:32 PM2022-11-02T23:32:11+5:302022-11-02T23:33:33+5:30

Ganapatipule News: समुद्राच्या पाण्यात बाेटीतून राईड मारताना काेल्हापूर येथील प्राैढ समुद्रात पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.३० घडली. त्यांना वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

A tourist from Kolhapur survived drowning in Ganapatipule | गणपतीपुळेत काेल्हापूरचा पर्यटक बुडता बुडता वाचला  

गणपतीपुळेत काेल्हापूरचा पर्यटक बुडता बुडता वाचला  

Next

- संजय रामाणी

गणपतीपुळे : समुद्राच्या पाण्यात बाेटीतून राईड मारताना काेल्हापूर येथील प्राैढ समुद्रात पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.३० घडली. त्यांना वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला. विजय बाबासाे वनकुद्रे (५५, रा. निर्माण चाैक, संभाजी नगर, काेल्हापूर) असे या प्राैढाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विजय वनकुद्रे हे आपल्या कुटुुंबासाेबत रत्नागिरीतील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे बुधवारी (२ नाेव्हेंबर) देवदर्शनासाठी आले हाेते. देवदर्शन करून हे सर्व जण समुद्राच्या पाण्यात आंघाेळीसाठी उतरले हाेते. आंघाेळ करून झाल्यानंतर त्यांनी बनाना बाेटीतून राईड मारण्याचा निर्णय घेतला. राईड मारून परत येत असताना विजय वनकुद्रे बाेटीतून पाण्यात पडले. त्यांनी लाईफ जॅकेट घातलेले हाेते. मात्र, बाेटीची दाेरी पायात अडकल्याने आणि त्यांना पाेहता येत नसल्याने ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.  त्यामुळे त्यांच्या पाेटात काही प्रमाणात समुद्राचे पाणी गेले.

माेरया वाॅटर स्पाेर्टसच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. त्यांना गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Web Title: A tourist from Kolhapur survived drowning in Ganapatipule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.